Amitabh Bachchan | Metro चं समर्थन करणाऱ्या Big B ला तरुणाईने सुनावले खडेबोल | Mumbai

2021-09-13 0

मुंबई--सुपर स्टार बीग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रोची रि ओढत ट्विट केले होते.त्यामुळे काल सकाळी तरुणाईने त्यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याच्या बाहेर शांततेत निदर्शने केली होती.आज वॉचडॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेने व
सकाळी 10 ते 12 तरुण व 7 ते 8 तरुणांनी बीग बीच्या घरा बाहेर निदर्शने केली.यावेळी रास्ता रोको व गोंधळ घालणाऱ्या तरुणाईला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.मात्र यावेळी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा,अँड.गॉडफ्रे पिमेटा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र शांततेत निदर्शने करून बीग बीचे निवेदन त्यांच्या सुरक्षा रक्षकांना दिले. या निवेदनात बीग बीला चांगलेच खडेबोल सुनावले अशी माहिती त्यांनी दिली.

या मेट्रो लाईन 2 बी चा मूळ मार्ग रोड क्रमांक 10 वरून जात होता ज्यात तुमचे निवास "प्रतीक्षा" म्हणून ओळखला जातो. आपल्या निवासस्थानाचे रक्षण करण्यासाठी, आपण मूळ मार्गावर जोरदारपणे आक्षेप घेतला,पुढे, प्रतिक्षा बंगल्याजवळ रस्ता रुंदीकरणाच्या वेळी तुम्ही रोड लाईनमुळे बाधित होणारी जमीन महामंडळाकडे सोपू दिली नाही,आरेची रि ओढणाऱ्या पैलूवरील तुमचे ट्विट मागील प्रकरणात आपल्या स्वतःच्या वागणुकीशी पूर्णपणे विरोधाभास आहे.जेव्हा स्वत: ची मालमत्ता येते तेव्हा आपले नियम वेगवेगळे असतात, पण जेव्हा आरे (प्रत्येक मुंबईकरांची सार्वजनिक मालमत्ता) येते तेव्हा ते नियम वेगवेगळ्या असतात. आम्ही आपला हा विरोधाभास समजण्यास अक्षम आहोत.
आईसा तो आदमी लाइफ में दोच टाइम बोलता है. ऑलिम्पिक का रेस हो या पोलिस का केस हो.तुम किसलीये बोलता है सर? 'असा टोला आमिताभ बच्चन यांना दिलेल्या पात्रतून खडे बोल सूनवल्याची माहिती निकोलस अल्मेडा व गॉडफ्रे पिमेटा यांनी लोकमतशी बोलतांना शेवटी दिली.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #AmitabhBachchan #bigb #metro

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रका?